बुलढाणा: मलकापूर पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा दोनशे पोते तांदूळ साठा वाहनासह जप्त केला आहे. या कारवाईत राजस्थानमधील व्यक्तीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने काळ्या बाजाराचे धागेदोरे दूरपर्यंत असल्याची शक्यता आहे.
काळ्या बाजारात जाणारा तब्बल २०० पोते तांदूळ मलकापूर पोलिसांनी जप्त केला आहे. हा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती मलकापूर पोलिसांना मिळाली. आठवडी बाजार परिसरात असलेल्या खान ब्रदर्स या दुकानासमोर असलेल्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये तांदूळचे पोते आढळून आले. विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
हेही वाचा – “भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात”, अनिल देशमुखांचा दावा, म्हणाले…
हेही वाचा – सरकारी कार्यालयात प्रीपेड वीज मीटर; केंद्र सरकारचे सुतोवाच
राजस्थानमधील कासिम खान नजरखान व मलकापूर येथील हसन खान अब्दुल्ला खान यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम सोबत इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून २०० पोते तांदूळ आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.