नागपूर : राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. अलीकडे हे राष्ट्रीय उद्यान चर्चेचा विषय बनले आहे. त्याला कारणही तसेच आहे. या उद्यानातील ‘रिद्धी’ ही वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांना अक्षरश: वेड लावले आहे. कधी ही वाघीण बछड्यासह मगरीची शिकार करतात, तर कधी या वाघिणीचे बछडे मस्ती करताना आढळतात. अलीकडेच रणथंबोरच्या पाणवठ्यात मस्ती करताना त्यांची चित्रफित वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंग यांनी चित्रित केली आहे.
रिद्धी ही रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील उपप्रौढ वाघीण आहे. रिद्धीच्या आईने जिथे स्वत:चा अधिवास निर्माण केला होता, तोच अधिवास रिद्धीने देखील स्वीकारला आहे. साधारणपणे ती झोन क्रमांक तीन आणि चारपासून पदम तलाव, राज-बाग, मलिक तलाव आणि मांडूप परिसरात फिरते. उप-प्रौढ वाघांसाठी जंगलात स्वतःचा अधिवास निर्माण करणे हा एक सामान्य मार्ग आहे, तर उप-प्रौढ वाघ पालकांच्या क्षेत्रापासून दूर स्वतःचा अधिवास निर्माण करतात. रिद्धीचा जन्म ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०१८ च्या आसपास होऊ शकतो. ती ‘ॲरो-हेड उर्फ ‘टी-८४’ ची मुलगी आहे. रिद्धीची आई ही रणथंबोरची राणी आहे. कारण तिच्याकडे व्याघ्र प्रकल्पातील तीन तलावांच्या आसपास वाघांचे उत्तम अधिवास क्षेत्र आहे. ती बरेचदा एक आणि दोनच्या काही भागतही वारंवार फिरत असते. रिद्धीला ‘टी-१२४’ हे अधिकृत नाव आहे. रिद्धीला सिद्धी उर्फ टी-१२५ ही बहीण असून ती देखील रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण आहे.
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या उद्यानातील ‘रिद्धी’ ही वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांना अक्षरश: वेड लावले आहे. (व्हिडीओ क्रेडिट – अभिषेक सिंग) pic.twitter.com/rE6nAIhODy
— LoksattaLive (@LoksattaLive) July 7, 2024
हेही वाचा : खळबळजनक! अमरावती कारागृहात चेंडूत आढळले स्फोटक पदार्थ
रिद्धीच्या बछड्यांनी पर्यटकांसह रणथंबोरच्या अधिकाऱ्यांनाही लळा लावला आहे. वाघिणी रिद्धी आणि तिचे शावक यांचे नाते पाहण्यास खूप गोड आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर अनेकदा त्याचे कोमल क्षण असतात. कित्येकदा रिद्धी आणि तिची तीचे बछडे राष्ट्रीय उद्यानात फिरताना दिसली होती. तीचे बछडे कायम उर्जा आणि उत्साहात दिसतात. कधी रिद्धी जमिनीवर विसावलेली असताना तिच्या एका बछड्याला प्रेमाने खेळताना आणि त्याला सांभाळताना दिसते. तर कधी रिद्धी आणि तिची पिल्ले पाणवठ्यातत आराम करताना आणि आनंदाने आंघोळ करताना दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी वैशिष्ट्ये दिली आहेत हे सिद्ध होते. अलीकडेच रिद्धीने तिच्या बछड्यांसह मगरीची शिकार केली होती. मगर हा अतिशय शक्तिशाली आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो. त्यांच्याशी स्पर्धा करणे सोपे नाही, पण रिद्धी आणि तिच्या बछड्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे.