बुलढाणा: केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर रजत नगरी म्हणून आटपाट खामगाव नगरीची ओळख. ही ओळख किती सार्थ आहे  हे येथील कारागिरांनी वारंवार सिद्ध  केले. यंदा गणेशोत्सव निमित्त येथे चांदीतून साकारण्यात आलेली भव्य  गणरायाची मूर्ती लौकिकात भर टाकणारी ठरली आहे. खामगाव शहरात शुद्ध चांदी च्या सर्व वस्तू, दागिने, मुर्त्या या शहरात बनविल्या जातात. अनेक राजकीय नेते, ‘सेलिब्रिटी’ च्या घरातील दिवाणखान्यात या वस्तू विराजमान आहे. देशविदेशातच नव्हे येथील ‘ चांदी’ अगदी अंतराळात सुद्धा गेली आहे.

भारताच्या चांद्रयान मध्ये सुद्धा येथे निर्मित चांदीची उपकरणे लावण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सव निमित्त नावाप्रमाणेच असलेल्या अनोखा गणेश मंडळाने विश्वकर्मा ज्वेलर्स ला सुमारे पाच महिन्यांपूर्वी एक अनोखी ‘ऑर्डर’ दिली! त्यानुसार विश्वकर्मा ज्वेलर्सने येथे ही गणरायाची चांदीची  १०५ किलो  वजनाची गणेशाची मूर्ती तयार केली. शुद्ध चांदीच्या या मूर्तीसाठी ‘अनोखा’ ने तब्बल ९० लाख रुपये मोजले!  सुबक व आकर्षक अन तितकीच भव्य  मूर्ती साकारण्यासाठी  चार ते पाच महिन्याचा अवधी लागलाय. आज या रजत मूर्तीने जालना शहराकडे प्रस्थान केले असून उद्या तिची जालन्यात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.

Story img Loader