केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली. देशाने जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. या सरकारच्या आर्थिक योजनामुळे भारत पुढील वर्षी पाचव्या क्रमांकावर येईल आणि २०३० पर्यंत रशिया, चीन आणि अमेरिकेला मागे टाकून जगातील पहिल्या तीन देशांत भारताचा समावेश असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे आज रविवारी विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. राज्यघटनेचा उद्देश समानता आणणे आहे, परंतु समाजातील एका घटकाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्याचा विकास होऊ शकत नव्हता. त्यामुळे आर्थिक मागास लोकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यात दलित आणि दलितांसाठी काम करण्याची तळमळ आहे. या सरकारच्या योजनांवर नजर टाकल्यास हे दिसून येईल. आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांना गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होत आहे. गरिबांप्रती आस्था असलेला पंतप्रधानच अशा योजना राबवू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

विदर्भवाद्यांच्या घोषणा, गडकरी संतापले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणादरम्यान विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली.  काही युवकांनी  पत्रके हवेत भिरकावली.  त्यात २०१४ मध्ये गडकरी यांनी  स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख होता. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. घोषणांमुळे  गडकरी संतापले.  ‘असे गोंधळी खूप बघितले’, काँग्रेसवाल्यांनी यांना पाठवले, असा आरोप केला.

हा अपप्रचार-गडकरी

ज्यांनी आणीबाणी लागू करून ८० वेळा राज्यघटना बदलली, ते आज भाजपवर राज्यघटना बदलतील असा प्रचार करीत आहेत. आम्ही कधीही राज्यघटना बदलणार नाही, परंतु पराभवाच्या भीतीने घाबरलेली काँग्रेस- राष्ट्रवादी दलित, मुस्लिमांना भाजप राज्यघटना बदलणार म्हणून घाबरवत आहे. दंगल घडवण्याचे स्वप्न बघत आहे, असा घणाघात गडकरी यांनी केला.