नागपूर: एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांना ‘इंटरनॅशनल अलम ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.हा पुरस्कार नुकत्याच झालेल्या समारोह दरम्यान प्रदान करण्यात आला. राजू केंद्रे यांना हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी आणि एकलव्य इंडिया फाउंडेशन‌द्वारे केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रदान करण्यात आला. नुकतीच राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 राजू केंद्रेंचा प्रवास

राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. राजु यांच्या आई वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झालेले नाही. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावे लागले. त्यांच्या ह्या अनुभवातूनच त्यांना एकलव्य फाऊंडेशन सुरू करावे वाटले. याच दरम्यान, पुणे सोडल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून पूर्ण करावं लागलं. यानतंर पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा >>>कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?

ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित चेव्हेनिंग स्कॉलरशिप

२०२१ मध्ये राजू यांना जगातील प्रतिष्ठित अशी ब्रिटिश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांनी मागच्याच वर्षी एसओएस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून एमएससी इन डेव्हलपमेंट स्टडीजचे शिक्षण पूर्ण केले. लंडन येथील शिक्षणादरम्यान, त्यांनी उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन केले आहे. .राजू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडिश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट येथील फेलो म्हणून पण निवडले होते. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांना ३० प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केले होते. यानंतर राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. सध्या ते जर्मनीत असून जर्मनी व भारतातील उच्च शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास, उच्च शिक्षणातील असमानता व त्यावरचे धोरणात्मक बदल ह्या विषयात त्यांचे संशोधन कार्य करत आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : मुलींसाठी आईवडिल चिंतित,अन् ती सापडली ….

काय म्हणाले राजू केंद्रे

२०२१-२२ वर्ष माझ्यासाठी खास होते. एसओएस युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये शिकून आणि चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवून माझ्या वैयक्तिक प्रवासासोबत आमच्या ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’च्या कामात मोठी भर पडली. अजूनही उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी आणि वंचित समुदायांना नेतृत्वाची संधी निर्माण करण्यासाठी बरेचं काही करणे बाकी आहे. भारतातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि ते निर्णय प्रक्रियेत धोरण कर्ते बनू शकतील यासाठी आम्ही प्रय्नशील आहोत. हा पुरस्कार आम्हाला या दिशेने अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करेल. हा पुरस्कार मी पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना समर्पित करतो,” या शब्दात राजू केंद्रे यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय आहे पीआयई ऑनर्स अवॉर्ड्स

पीआयई ऑनर्स अवॉर्डस हे आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे, जे दैनिक बातम्या, विश्लेषण आणि बु‌द्धिमत्ताद्वारे व्यावसायिक, संस्था आणि व्यवसाय जोडतो. त्यांचा जागतिक कव्हरेज उच्च शिक्षण, ऑनलाइन शिक्षण, के-१२ आणि विदेशाध्ययन यांचा विस्तार करतो. पीआई च्या कार्यक्रमांमध्ये द पीआयई लाईव्ह  कॉन्फरन्स आणि द पीआयइ ऑनर्स अवॉर्ड यांचा समावेश आहे. हे कार्यक्रम समुदाय, ज्ञान सामायिक आणि नाविन्य निर्माण करतात. २०२४ चा समारंभ लंडनच्या प्रसिद्ध गिल्डहॉलमध्ये पार पडला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju kendre founder and ceo of eklavya india foundation was awarded the international alum of the year award nagpur news dag 87 amy