नागपूर : २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे रीतसर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकाने २२ तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे. महामेट्रो यात मागे नाही. नागपूर मेट्रोतर्फे २२ जानेवारीला प्रवाशांकरिता तिकिटावर ३० % सुट जाहीर केली आहे. शासकीय रजेच्या दिवशी नागपूर मेट्रो तर्फे ३० % सुट नेहमीच दिली जाते. तोच लाभ या २२ तारखेला (सोमवारी) अयोध्या येथील सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळणार असून, यामुळे शहरात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणे अधिकच सोपे होणार आहे.

हेही वाचा – नागपूर: वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच गवसला…

हेही वाचा – “वंचितला सोबत न घेतल्यास काँग्रेस नेते तुरुंगात जातील,” अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सूचक इशारा; म्हणाले, ‘तुमची सत्ता…”

नागपूरकरांनी याचा फायदा घेत कार्यक्रमात सहभागी होण्याकरता नागपूर मेट्रोचा वापर करावा हे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे. मेट्रो सेवा ठरलेल्या वेळे प्रमाणे सकाळी ६ ते रात्रो १० पर्यंत नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir inauguration in ayodhya 30 percent discount on metro fare in nagpur cwb 76 ssb