नागपूर : शरद पवार यांनी देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यायला हवे. राहुल गांधींच्या नादाला त्यांनी लागू नये, ‘इंडिया’ ही चुकीच्या वेळेला झालेली नकारात्मक आघाडी असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आलो. शरद पवार यांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यायला पाहिजे.” असे आठवले म्हणाले.

हेही वाचा – “चाकूने वार करून ठार करू,” नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; गुन्‍हा दाखल

हेही वाचा – वरुणराजा रुसले! यंदाचा ऑगस्ट इतिहासातील सर्वात ‘कोरडा’ महिना ठरणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी गट एकत्र आले तरी २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा टीकाव लागणार नाही. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे ते म्हणाले. अजित पवार महायुतीत आल्याने महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale advice to sharad pawar he said that sharad pawar should come with pm narendra modi for the sake of the country vmb 67 ssb