लोकसत्ता टीम
वर्धा: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिष्यवृत्तीचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. राज्य शासनातर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज विदेशी शिष्यवृत्ती मिळते.
दरवर्षी त्यात ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. मात्र ही संख्या पुरेशी नाही. अनेक गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना त्यामुळे संधी मिळत नाही. ते चांगल्या उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून ७५ ऐवजी ही संख्या २०० पर्यंत वाढवावी, अशी मागणी रिपाई आठवले गटाचे नेते विजय आगलावे, विनोद थुल, राम रतन बिसेन यांनी आठवले यांच्याकडे केली.
आणखी वाचा-खासदार असुद्दीन ओवैसी यांना नागपुरात धक्का! ‘एमआईएम’चे ४० कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
दिल्ली येथील आठवले यांच्या निवासस्थानी हे शिष्टमंडळ गेले होते. या मागणीवर भाष्य करतांना आठवले यांनी ही उचित मागणी असल्याने त्याचा पाठपुरावा करू व मान्य करून घेवू, अशी हमी दिल्याचे आगलावे यांनी सांगितले.