वर्धा : भाजपातर्फे उमेदवार म्हणून घोषणा झालेले रामदास तडस यांच्या कार्यालयात जणू विजयाचाच गुलाल उधळल्या जात आहे. त्यांचे तिकीट कापले जाणार आणि दुसऱ्यास संधी मिळणार, या चर्चेस उधाण आले होते. मात्र, त्यावेळीच खासदार रामदास तडस यांनी बोलकी प्रतिकिया व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसत्ता ‘ऑनलाईन’सोबत बोलताना ते म्हणाले होते की, मोठा महादेव (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझ्यासोबत आहे. म्हणजेच पक्षाचे कर्तेधर्ते त्यांना साथ देणार, असा त्यांना विश्वास होता, तो सार्थ ठरला. आता या संधीचे सोने झाल्यास विक्रम घडू शकतो. म्हणजे १९५७, १९६२, १९६७ असे सलग तीन वेळा कमलनायन बजाज हे वर्धा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर १९८०, १९८४, १९८९ असे तीन वेळा वसंत साठे खासदार झाले. आता २०१४ व २०१९ असे दोन वेळा खासदार झालेले तडस तिसऱ्यांदा खासदार होण्यास सज्ज आहेत. तीन वेळा खासदार होणारे तिसरे खासदार, असा बहुमान मतदार त्यांना देणार का, हा आता उत्सुकतेचा भाग ठरत आहे.