वर्धा : गर्भवती मातांबाबत काही पारंपारिक समज गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सावंगी येथील रूग्णालयात खास गर्भवती मातांसाठी झालेल्या ‘रॅम्प वॉक शो’ने प्रेक्षकांची मने जिंकली. गर्भवतीने ज्यास्त हालचाल करू नये.जड वस्तू उचलू नये.कामे टाळावी.असे समजल्या जाते.पण असे दडपण न ठेवण्याचा संदेश देण्याचा हेतू यामागे होता. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात जागतिक गर्भविज्ञान दिनानिमित्त या खास फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ५२ मातांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत ‘मिसेस मदर अँजल्स’च्या विजेतेपदाचा सन्मान भाग्यश्री रितेश देशमुख यांना प्राप्त झाला. एकता जगदीश ठाकरे आणि भाग्यश्री मोहित सोमनाथे या उपविजेता ठरल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकरांनी ठरवून खाल्ली मटण बिर्याणी… म्हणाले, भाजप-संघाचे गुंड….

मातृत्वबाबत असलेले परंपरागत गैरसमज दूर सारून आरोग्य विषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या फेरीत मातांनी रॅम्प वॉक करीत लक्ष वेधून घेतले. दुसऱ्या फेरीत स्त्रीत्व व मातृत्व याविषयी विचारलेल्या प्रश्नांना समयसूचक उत्तरे देत उपस्थितांना जिंकून घेतले. विजेतांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा परिषदेच्या उपमुख्याधिकारी ज्ञानदा फणसे तसेच कुलसचिव डॉ.श्वेता काळे पिसुळकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.उदय मेघे यांच्या हस्ते विजेतेपदाचा मुकूट प्रदान करण्यात आला. प्रोत्साहन पुरस्कारप्राप्त संपदा राऊत, पुष्पा हेडावू, सोनाली पाटील, काजल बनसोडे, अपेक्षा रामटेके, जया वानखेडे, लता पंडित, रजनी चाहनकर यांचाही सन्मान करण्यात आला. सर्व विजेत्यांना रोख पुरस्कार तसेच बाळंपणात उपयुक्त साहित्य व भेटवस्तु देण्यात आल्या. संचालक मनिषा मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, उपसंचालक अमित दास, टेस्ट ट्यूब बेबी सेंंटर प्रमुख डॉ.दिप्ती श्रीवास्तव, स्त्रीरोगतज्ञ डॉ.कमलेश चौधरी, डॉ.निमा आचार्य, डॉ.रंजना शर्मा तसेच डॉ.पूजा व्यास यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. सहभागी सर्व गर्भार मातांना रूग्णालयाचे सुमन योजना कार्ड देण्यात आले.