नागपूर: रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहे. काँग्रेसची ही भूमिका संशयास्पद असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केला होता. मुळक यांना सुनील केदार यांचे पाठबळ होते. मात्र बंडखोरी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक यांना यश आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आशिष जयस्वाल विजयाच्या दिशेने आहेत.
रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा झाली होती. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागत होते. मात्र सुनील केदार यांना त्यांच्या मतदारसंघात पत्नीलाही विजयी करता आले नाही. तर बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांनाही ते विजयी करू शकले नाही असे दिसून येते. यामुळे यावेळी सुनील केदार यांचा करिष्मा काहीसा कमी झाला अशी चर्चा आहे.
हेही वाचा – सुनील केदार यांना मोठा धक्का! पत्नीला विजय मिळवून देण्यात अपयशी, भाजप विजयाकडे
रामटेक – पंधरावी फेरी
आशिष जयस्वाल – ८७१९४
राजेंद्र मुळक – ६८००६
चंद्रपाल चौकसे – २९१२
विशाल बरबटे – ३५७५