लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत असताना कुठल्या मतदारसंघात किती कोट्यावधीश उमेदवार आहे, कोणत्या उमेदवाराकडे किती कोटी रुपये आहेत ही चर्चा रंगली आहे. मात्र. दुसरीकडे या निवडणूक काही उमेदवार अत्यंत गरीब आहेत.

निवडणूक भरलेल्या नामांकनपत्राच्या आधारावरील लोकसभा निवडणूकीतील पहिल्या फेरीतील टॉप-१० गरीब उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचाही समावेश आहे. रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार कार्तिक गेंदलाल डोके यांनी स्वत:कडे केवळ ५०० रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा नामांकनपत्रात केला आहे. टॉप-१० गरीब उमेदवारांच्या यादीत कार्तिक डोके दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ४४ वर्षीय डोके हे विश्व हिंदू जनसत्ता पक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. देशात पहिल्या फेरीत त्यांच्यापेक्षा गरीब उमेदवार तमिळनाडूतील थूत्तुकुडी मतदारसंघातील आहे. पोनराज के. नावाच्या या उमेदवाराकडे केवळ ३२० रुपयांची मालमत्ता आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील कार्तिक डोके हे नागपूरच्या इतवारीमध्ये राहतात. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा ते करतात.

आणखी वाचा-यवतमाळात शिवसेना विरूद्ध शिवसेनाच! १७ उमेदवार रिंगणात

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे खाते असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली, मात्र त्यात पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावावर एक मारुती अल्टो-८०० गाडी देखील आहे. मात्र रोख रक्कम केवळ ५०० रुपये आहे, असे डोके शपथपत्रात म्हणाले. त्यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नसल्याचा तसेच एकही न्यायालयीन प्रकरण नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘टॉप-१०’ गरीब उमेदवार

पहिल्या फेरीतील ‘टॉप-१०’ गरीब उमेदवाराच्या यादीत तमिळनाडूतील आठ उमेदवार आहेत. पहिल्या स्थानावर तमिळनाडूच्या थूतुकुड्डीमधील पोनराज के. (३२० रुपये), दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्रातील रामटेकमधील कार्तिक डोके (५०० रुपये), तिसऱ्या स्थानावर चेन्नई उत्तर मतदारसंघातील सुरुमुथु (५०० रुपये) यांचा समावेश आहे. यानंतर तमिळनाडूच्या अर्नीमधील जी.दामोधरण (एक हजार रुपये), चेन्नई उत्तरमधील जे.सेबास्टिन (१,५०० रुपये), पुडुचेरीतील एस.सतीशकुमार (दोन हजार रुपये) आहेत. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर तमिळनाडूच्या दिंडीगुल मतदारसंघातील सुरेश के.(दोन हजार रुपये) आणि पलनीस्वामी के.(दोन हजार रुपये) आहेत. नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली मतदारसंघातील पी.गोविंदरासू (दोन हजार रुपये) आणि कृष्णन एस. (साडे तीन हजार रुपये) यांचा समावेश आहे.