नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघाच्या मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात विदर्भाच्या संघाने हरयाणाचा ११५ धावांनी पराभव केला. विदर्भ संघासाठी दीड दशकाहून अधिक काळापासून फलंदाजीचा कणा असलेला व संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार फैज फजलने रविवारी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फैजने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. विदर्भ संघाने सोमवारी हरयाणावर विजय प्राप्त करत फैज फजलला विजयी निरोप दिला. विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या पारीमध्ये ४२३ धावा काढल्या. यानंतर हरयाणा संघाला ३३३ धावांमध्ये गुंडाळत ९० धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. विदर्भाच्या संघाने दुसऱ्या पारीमध्ये २०५ धावा काढल्या. हरयाणा संघ २९५ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना १८० धावांमध्ये ऑलआऊट झाला.

हेही वाचा – वाशिम : अबब! एकाच मंडपात तब्बल २६ वधू-वर विवाहबद्ध

सामन्याच्या अंतिम दिवसाच्या पूर्वसंध्येला फैज फजलने निवृत्तीची घोषणा केली होती. फैजच्या नेतृत्वात विदर्भ क्रिकेट संघाने देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे रणजी व इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. फैजच्या नेतृत्वात विदर्भ संघाने २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन हंगामांत रणजी व इराणी करंडक पटकावत देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाचा डंका मिरवला होता. १३७ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या फैजने ४१.३६ च्या सरासरीने ९ हजार १८७ धावा केल्या आहेत. यात २४ शतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – समाज माध्यमावर पोस्ट केली म्हणून परीक्षेत सहभागी होऊ दिले नाही, उच्च न्यायालय म्हणाले…

फैजने विदर्भ संघाबरोबरच रेल्वे संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. एक उत्तम डावखुरा फलंदाज असलेल्या फैजने १७ डिसेंबर २००३ साली विदर्भाकडून पदार्पणातच रणजी स्पर्धेत १५१ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy vidarbha beat haryana by 115 runs farewell to this international player tpd 96 ssb