नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या सिव्हिल लाइन्स येथील मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात विदर्भाने मध्यप्रदेश संघाचा ६२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यजमान संघ विदर्भाने पहिल्या डावात केवळ १७० धावा काढल्या. यानंतर मध्य प्रदेश पहिल्या डावात सर्वबाद २५२ धावा काढत महत्वपूर्ण आघाडी घेतली. यजमानांचा दुसरा डाव ४०२ धावांवर आटोपला. मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. हिमांशू मंत्रीला आदित्य सरवटने स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर मात्र यश दुबे आणि हर्ष गवळीने १०६ धावांची भागीदारी करत विदर्भाला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत, मध्य प्रदेशचा संघाला २५८ धावांमध्ये बाद करत विजय प्राप्त केला.

हेही वाचा – भंडारा-गोंदियात ‘जातकारण’ तापले

हेही वाचा – वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा…

विदर्भाच्या यश राठोड यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. १० मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात होणाऱ्या अंतिम सामन्यात विदर्भाची लढत मुंबई संघाशी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy vidarbha beat madhya pradesh for final tpd 96 ssb