लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : तरुणीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्यासोबत कुटुंबीयांनी संबंध तोडले. मात्र, तिच्या भेटीला लहान बहीण नेहमी जात होती. या दरम्यान बहिणीच्या दिरासोबत तिचे सूत जुळले. दोघेही एका शेतात चोरून भेटताना मुलीच्या वडिलांना दिसले. त्यांचे प्रेमसंबंध उघडकीस येताच मुलगी आणि वडील पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन (२१, नाड) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पीडित १६ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थीनी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे रोशनच्या मोठ्या भावासोबत प्रेसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्या वडिलांनी लग्नास विरोध दर्शविला. दोघांचे प्रेमसंबंध तुटले होते. परंतु. मुलीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी मोठ्या मुलीशी सर्वच प्रकारचे संबंध तोडले. तिला घरी येण्यास मनाई करण्यात आली. मात्र, मोठ्या बहिणीच्या मायेपोटी लहान बहीण लपून तिला भेटायला जात होती.

आणखी वाचा-यवतमाळात आयआयटी, वाशीमला एआयआयएमएस तर पुसदला आयआयएम…

बहिणीच्या घरी नेहमी जात असल्यामुळे बहिणीचा दिराशी तिचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांच्याही प्रेमप्रकरणाला बहिणीनीने पाठिंबा दिला. १९ डिसेंबरला मुलगी घरातून बाहेर पडली आणि प्रियकराला भेटायला गेली. सलग तीन दिवस मुलगी घराबाहेर जात असल्यामुळे वडिलाने तिच्यावर पाळत ठेवली. २२ तारखेला मुलगी बाहेर पडल्यानंतर वडिलही तिच्या मागोमाग गेले. एका शेतात वाट बघत असलेल्या रोशनसोबत निघून गेली. काही अंतरावर दोघांनाही वडिलांनी पकडले आणि चांगला चोप दिला. मुलीला उमरेड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तक्रारीवरून रोशनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.