नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना पारडी येथे उघडकीस आली. नीलेश योगेश्वर हेडाऊ (४०, हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) उच्चशिक्षित आहे. तिचे वडील अपंग असून तिच्या आईचे निधन झाले आहे. लहान बहिणीसह ती अंबाझरी भागात राहते. वडिलांची जबाबदारी आणि लहान बहिणीच्या शिक्षणाचा खर्च बघता तिला नोकरीची गरज होती. २८ जूनला रिया मोरभवन बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होती. तेथे तिची नीलेश हेडाऊसोबत भेट झाली. त्याने हॉटेल व्यवसायी असल्याचे सांगून नोकरी लावून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

नीलेशने स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. ३ जुलै रोजी दुपारी त्याने रियाला फोन करून नोकरीसाठी मुलाखतीला कोराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे रिया तासाभरात गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर आली. तेथून ते दोघेही. दुचाकीने कोराडीकडे न जाता पारडी मार्गाने एका मंदिराजवळ आले. तेथील एका पडक्या घरात नीलेशने रियाला नेले. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. त्याने नोकरी हवी असेल तर शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली. रियाने नकार देऊन घरी सोडण्यास सांगितले. अंधारात कुणीही मदतीला नसल्याचे बघून नीलेशने तिच्यावर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिला घरी आणून सोडले आणि पळ काढला.

Story img Loader