नागपूर: एकाच कंपनीत कामावर असताना तरुणाची एका तरुणीशी ओळख झाली. त्याने ओळखीचा फायदा घेत तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्नाला नकार देऊन तो फरार झाला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अमन शिवकुमार शर्मा (२०, कृष्णानगर) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमन शर्मा याची गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीशी कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली व अमनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फेब्रुवारी २०२३ रोजी तिला धार्मिक पूजा असल्याचे सांगून स्वत:च्या घरी नेले. मात्र, घरी कुणीही नव्हते तर कोणताही धार्मिक कार्यक्रम नव्हता. अमनने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने बळजबरी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. तिने लग्नाबाबत विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

हेही वाचा… धाड मध्ये उभे राहणार दिमाखदार शिवस्मारक; पायाभरणीत गडकिल्ल्यांची माती अन् जल!

१५ ऑक्टोबर रोजी त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने त्याला लग्न केव्हा करणार, अशी विचारणा केली. त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल होताच पोलीस घरी पोहचण्यापूर्वीत तो फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.