नागपूर : काटोल आणि कन्हान पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात या घटना घडल्याने येथील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. पहिली घटना काटोल पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथे आरोपी तुषार नागोसे (२८) याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याच्या बहाण्याने जवळच्या गोठ्यात नेले. येथे त्याने मुलीवर अत्याचार केला व ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – चंद्रपूर : हेटी येथील सरस्वती जिनींगमध्ये भीषण आग, शंभर क्विंटल कापूस जळून खाक

दुसरी घटना २६ एप्रिलला कन्हान पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथे लक्ष्मीकांत गेडाम (३०) या आरोपीने एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. दोन्ही प्रकरणात पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Story img Loader