अकोला : नातेवाईकाच्या घरी पोळ्या करण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिसेंबर २०१६ मध्ये पीडित महिला त्यांच्या नातेवाईक आरोपी याच्या घरी पोळ्या करण्यासाठी गेली होती. आरोपी शिवा लहानु विल्हेकर (३७, रा.बोरगांव मंजू) याने दार बंद करून जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणी सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. पुरावा व ‘डी.एन.ए.’ अहवाल ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी शिवा विल्हेकर याला दोषी ठरवून १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व दोन हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा – नैसर्गिक आपत्तीने तुरीचे उत्पादन घटले अन् दर वाढले; अकोल्यातील बाजारपेठेत मिळतोय उच्चांकी दर

हेही वाचा – नागपूर कारागृहात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र बरॅक, राज्यातील पहिला प्रयोग नागपूर कारागृहात

दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधा कारावास भोगावा लागेल. तसेच भादंवि कलम ५०६ (२) अंतर्गत दोषी ठरवत दोन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजारांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगाव्या लागतील. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शितल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.