बुलढाणा : शेगाव तालुक्यातील कमी अधिक सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हजारो आबालवृद्ध गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या प्रकाराची आरोग्य यंत्रणानी गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शेगाव तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गिते यांना निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेत गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची मागणी केली. तसेच नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर बाबी बाबत अवगत केले. यामुळे नामदार जाधव यानीही यात लक्ष घातले आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोड वर असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-प्रवाशांनी कृपया लक्षात घ्यावे… नॉन-इंटरलॉकिंगमुळे या गाड्या गुरुवारपासून रद्द

सहा गावात सर्वेक्षण

आरोग्य विभागाची पथके शेगाव तालुक्यातील ‘टक्कल बाधित ‘गावात डेरेदाखल झाली आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे हे शेगाव तालुक्यात तळ ठोकून आहे. शेगाव तालुक्यातील ‘बाधित’ गावात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावकऱ्यांची तपासणी करण्यात येत असून पाण्याचे नमुने घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गिते बारकाईने नजर ठेवून आहे. शेगाव तालुक्यातील भानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैध्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी अट्रट हे स्वतः त्वचा रोग तज्ज्ञ आहेत. हे नमुने तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रनेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.

अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाम्पू ने असा प्रकार घडत असावा असे काहींचे मत असले तरी आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…

शेगाव तालुक्यातील गोंडगाव कालवळ व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण आढळून आले.एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्ती चे केस गळून पडत असल्याने टक्कल सुद्धा होत आहे.तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभाग कडून जिल्हा साथरोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या प्रकाराबाबत कळवण्यात आले आहे.नेमका प्रकार का घडत आहे याचा आम्ही शोध घेत आहोत असे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिपाली भायेकर यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapid hair loss and baldness are caused by increased nitrate levels in water scm 61 mrj