चंद्रपूर:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या ईरई धरण परिसरात अतिशय दुर्मिळ असलेला दुर्मिळ अल्बिनो गढवाल बदक आढळला आहे. पक्षी मित्र तथा अभ्यासकांनी हा बदक पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही चंद्रपुरात विदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी आगमन करण्यास सुरुवात केली आहे, थंडी पासून बचाव तसेच अन्नाच्या शोधात अतिशय दुरवर हजारो किलोमीटर अंतर प्रवास करून ते चंद्रपुरात दाखल झाले आहेत. विदेशी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मोठी लालसरी, चक्राग बदक, चक्र‌वाक, काणुक बदक,भुवयी बदक, गढवाल, तलवार बदक हे पक्षी मोठ्या प्रमाणात आले आहेत.

tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
चिरनेरमधील बर्डफ्लूची साथ आटोक्यात आल्याचा पशुधन विभागाचा दावा, चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचेही नागरिकांना आवाहन
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
rushikesh wagh junnar taluka
संशोधनातील वाघ

हेही वाचा >>>महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

यंदा मात्र अतिशय दुर्मिळ अल्बिनो गढवाल ईरई धरण परिसरातील काटवल तुकूम तलावात आढळून आला आहे.गढवाल (Anas Strepera) हा बदकापेक्षा लहान, त्यांच्या पोटाचा भाग पांढरा, शेपटी काळीभोर असते, पंखावरती पांढरा डाग असतो. त्याच्या पंखांची काळी किनार उडताच ठळकपणे दिसून येते.गढवाल हे युरोप आणि उत्तर अमेरिका या भागांतून स्थलांतर करून येतात. अल्बिनीझम हा एक आनुवंशिक प्रकार असुन पक्ष्यांच्या शरीरात मेलेनीन या रंगद्रव्याची  जन्मजात अभावामुळे पांढरा रंग दिसतो.केस, पंख, खवले व त्वचा पांढरी आणि लालसर गुलाबी किंवा  निळे डोळे होतात.

हेही वाचा >>>अमृत महोत्सवी वर्षात आनंदवनला आर्थिक मदतीची गरज

अल्बिनो पक्ष्यांची पंख कमकुवत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो या कारणांमुळे अल्बिनो पक्षी फार काळ जगत नाही.साधारणता अशा प्रकारचे पक्षी किंवा प्राणी निसर्गात क्वचितच आढळतात कारण त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते लवकर भक्ष्य बनतात. अतिनील विकिरणांपासुन संरक्षण नसल्यामुळे भक्षकांपासुन दुर राहण्यासाठी क्षमता नसल्याने अल्बिनोचा जगण्याचा सरासरी कालावधी कमी असतो.अशी माहिती प्राणीशास्त्र संशोधन अभ्यासक शुभम संजय आत्राम यांनी दिली. शुभम संजय आत्राम (पक्षी संशोधन अभ्यासक), प्रा.डॉ. नरेंद्र हरणे, सुमेध वाघमारे, ,डॉ.हर्षद मटाळे‌,‌सुलेमान बेग  यांना पक्षी निरीक्षणात दुर्मिळ अल्बिनो गढवाल आढळून आला.दुर्मिळ असलेला पक्षी दिसल्याने चंद्रपूरच्या पक्षीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Story img Loader