पावसाळ्याच्या दिवसात सरपटणारे प्राणी बिळातून बाहेर येतात. पावसाचे पाणी बिळात गेल्याने हे प्राणी बाहेर येत असतात, अनेकदा तर घरातील अडगळीच्या ठिकाणी हे प्राणी ठाण मांडून बसले असतात. एखाद्याचे चुकूनही त्यावर पाय पडल्यास ते बचावासाठी हल्ला करतात. साप डंख मारतो आणि अनर्थ होतो.  हीच भीती असल्याने  नागपुरातील पिपळा फाटा परिसरात साप दिसल्यानंतर एकच तारांबळ उडाली.

हेही वाचा >>> चिखल महोत्सव: ‘बालपण भारी देवा’ म्हणत आदर्श इंग्लिश शाळेची मुलं रंगली चिखलात

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Girl dies in leopard attack in sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!

पिपळा फाटा येथील दीपलक्ष्मी सभागृहात जवळ दुर्मिळ प्रजातीचा एक साप आढळून आला. तो ठिपकेदार पिवळा रंग आणि लांबलचक होता. त्याला बघून परिसरातील नागरिक घाबरले. आपल्या घराच्या दिशेने येऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करू लागले. दरम्यान येथील क्रिश  देउलकर यांनी सर्पमित्र प्रतिक धवड यांना कळवले.

हेही वाचा >>> ग्लासासह ताम्हणाची मागणी वाढली कारण अधिक महिन्यात…

प्रतिक धवड, धीरज मिस्किन  व तुषार पाटील घटनास्थळी पोहचले. त्यांनी सापाला पकडले आणि दूर जंगलात सोडून दिले. हा साप अलबिनो चेकर्ड किल ब्याक (धोंड्या ) प्रजातीचा असल्याचे  सर्पमित्र प्रतिक धवड यांचे म्हणणे होते.