नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन १६ डिसेंबरला आयोजित केल्याने विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या समारंभात राज्यपाल प्रमुख अतिथी राहणार आहेत. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विविध सेमिस्टरचा परीक्षांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान विद्यापीठाच्या नियोजित तारखेनुसार १६ तारखेला जवळपास ३६ परीक्षांचा समावेश आहे. त्यात एमए, बीए, एमएस्सी, एम.लीब, बीबीसीए, बीएस्सी, बी.कॉम. या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यात हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अशावेळी अचानक पेपर रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला.  दरम्यान, काही महिन्यात विद्यापीठात घडलेल्या घडामोडी यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बराच लांबला आहे. दीक्षांत समारंभाशिवाय विद्यापीठाची पदवी अधिकृत होत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून डिसेंबर महिन्यात दीक्षांतचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. दरम्यान, १६ तारखेच्या परीक्षा पुढे ढकलल्यावर आता विद्यापीठाने नव्या तारखा जाहीर करीत २६ तारखेला पुढे ढकलण्यात आलेल्या विषयांच्या पेपरचे आयोजन केले आहे. त्यानुसार विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा >>>राज्यभरात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू महिलांचा… माहिती अधिकारात…

परीक्षा कधी होणार बघा

विद्यापीठामध्ये वर्षांतून एकदा दीक्षांत समारंभ घेणे आवश्‍यक आहे. गेल्या काही महिन्यात विद्यापीठात घडलेल्या घडामोडी यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बराच लांबला आहे. दीक्षांत समारंभाशिवाय विद्यापीठाची पदवी अधिकृत होत नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून डिसेंबर महिन्यात दीक्षांतचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे परीक्षांच्या तारखामध्ये बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. १६ तारखेच्या परीक्षा पुढे ढकलल्यावर आता विद्यापीठाने नव्या तारखा जाहीर करीत २६ तारखेला पुढे ढकलण्यात आलेल्या विषयांच्या पेपरचे आयोजन केले आहे. त्यानुसार विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे.

हेही वाचा >>>अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजना आता बाह्ययंत्रणेकडून! काय होणार परिणाम…

‘पेट’ परीक्षेची अद्याप घोषणा नाही

डिसेंबर महिना उजाळूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पेटबाबत (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) घोषणा करण्यात आलेली नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन दिशानिर्देश यावर्षी पेट होणार की नाही असा संभ्रम आहे. यावर अद्याप विद्यापीठ प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नोंदणीसाठी इच्छुक  उमेदवारांकडून प्रतीक्षाच सुरू आहे. सर्वसाधारणतः ‘पेट’साठी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान वेळापत्रक घोषित करण्यात येते. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत निकाल लागून पुढील प्रक्रियादेखील सुरू होते. मात्र, यावर्षी या परीक्षेबाबात कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukadoji maharaj nagpur university 36 exams postponed dag 87 amy