नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत पार पडलेल्या २०२२-२३ या शैक्षणिक सत्राच्या परीक्षांतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरण सोहळा शुक्रवार २ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पाण्डे उपस्थिती राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर येथील विद्यार्थी प्रणय आनंद पवार याने याने एमबीए परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ७ सुवर्णपदके प्राप्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवत नेहरकर याने बी.ए. एल.एल.बी. (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके व २ पारितोषिके प्राप्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा