राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप नसतो, असा दावा संघाकडूनच केला जात असला तरी खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीतच केंद्रीय दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी देशाच्या राजकारणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिशा मिळते, असे प्रतिपादन येथे केले.

राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेच्या बाराव्या दीक्षांत सोहळ्यानिमित्त नागपूरच्या पशु व मत्स विज्ञान विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, संघाचा स्वयंसेवक होणे ही सौभाग्याची बाब आहे.या कार्यक्रमाला सरसंघचालक उपस्थित आहेत. देशाच्या राजकारणाला त्यांच्या नेतृत्वात संघांकडून दिशा दिली जाते. ती जगाच्या राजकारणावर प्रभावी ठरत आहे.

रुपाला यांचे वरील विधान हे भाजपा किंवा देशाच्या राजकारणात संघाचा हस्तक्षेप नसतो, या संघाच्या दाव्याला छेद देणारे आहे, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी होती.

Story img Loader