लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १० एप्रिलला मेहकरात दाखल झाले. तब्बल ५ तास मेहकर शहर परिसरातील संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून त्यांनी कानमंत्र दिला.

सरसंघचालक डॉ. भागवत यांना असलेली झेड प्लस दर्जाची सुरक्षा लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि मोजक्याच संघ पदाधिकाऱ्यांनाच मेहकारातील प्रवासाची पूर्वकल्पना देण्यात आली होती. या प्रवासाबद्धल काटेकोर गुप्तता पाळण्यात आली. यामुळे त्यांच्या प्रवासाची आज वाच्यता झाली. तसेच विस्तृत तपशील मिळू शकला नाही.

आणखी वाचा-यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर

सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज गुरुवारी(दि ११ ) छत्रपती संभाजी नगरात प्रवास आहे. त्यानिमित्ताने काल बुधावरी नागपूरवरून छत्रपती संभाजी नगरला जात असताना ते मेहकर शहरात आले. संघाचे जिल्हा कार्यवाह सचिन देशमुख यांच्या निवासस्थानी डॉ. भागवत यांनी भोजन घेतले. तिथेच संघ स्वयंसेवकांशी चर्चा करून ते छत्रपती संभाजीनगर कडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtriya swayamsevak sangh sarsanghchalak dr mohan bhagwat in mehkar scm 61 mrj