अकोला : अपात्र असताना शिधापत्रिकेवर मिळणारे स्वस्त धान्य घेऊन लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९८१ जणांनी लाभ नाकारत असल्याचे अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली.
स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्न धान्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनाने ‘गिव्ह इट अप’, ही योजना राबवून अशा अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ त्याग करण्याचे आवाहन केले होते. त्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत होती. तथापि, त्यानंतर अपात्र असतांनाही लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी गावपातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती. त्याशिवाय लोकांनी स्वतःहून आपले अर्ज दाखल केले होते.
हेही वाचा >>> वृद्ध आणि तरुण वाघ समोरासमोर उभे ठाकले…जोरदार झुंज…अन पुढे जे झाले…!
जिल्ह्यात आतापर्यंत दक्षता समितीने प्राधान्य गट योजनेतील ६१४८, अंत्योदय अन्न योजनेतील ३०४, तर दारिद्रय रेषेवरील १२९७ असे एकूण ९०४३ लाभार्थी अपात्र असल्याचे कळविले आहे. ज्या लाभार्थ्यांनी स्वतःहून अर्ज दिले त्यात प्राधान्य गट योजनेतील १५८४, अंत्योदय अन्न योजनेतील ७४ तर दारिद्रय रेषेवरील ३०५ अशा एकूण १९८१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११०२४ लाभार्थी अपात्र असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान अपात्र असतांनाही लाभ घेणाऱ्या ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात बार्शीटाकळी येथे २५, तेल्हारा येथे १७, अकोला शहर येथे ८, अकोट येथे ५, बाळापूर येथे ७, पातूर येथे ३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.