अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाने येथील सायन्‍सकोर मैदानावर आयोजित केलेल्‍या कृषी महोत्‍सवात आचारसंहितेचे उल्‍लंघन झाल्‍याचा ठपका ठेवून प्रशासनाने महोत्‍सवाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या दबावातून ही कारवाई केली जात असल्‍याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्र्यांसह राणा दाम्‍पत्‍याची छायाचित्रे कृषी महोत्‍सवस्‍थळी झळकली होती. जिल्‍हा प्रशासनाने छायाचित्रांचे फलक शुक्रवारी हटवले. दरम्‍यान, महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांवर दबाव आणून हे प्रदर्शन बंद करण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला.

हेही वाचा >>> अमरावती : राणा दाम्‍पत्‍याच्‍या अडचणी वाढल्या, आचारसंहितेचा भंग झाल्‍याचा ठपका ठेवत फलक हटवले

रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर पुन्‍हा एकदा टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. उद्धव ठाकरे एकदाही  बांधावर गेले नाहीत. शेतकऱ्यांसाठी राबविण्‍यात येत असलेल्‍या योजनांची माहिती पोहचविण्‍यासाठी आम्‍ही कृषी महोत्‍सवाचे आयोजन केले आहे, त्‍यातही महाविकास आघाडीचे नेते खोडा घालत आहेत.

हेही वाचा >>> काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, म्हणाले “त्यांच्या नेतृत्वावर…”

आम्‍हाला जर जिल्‍हा प्रशासनाने फलक हटविण्‍यास सांगितले असते, तर ते आम्‍ही काढून घेतले असते, पण अशा पद्धतीने बळजबरीने फलक हटवणे योग्‍य नाही. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांची छायाचित्रे हटवण्‍याचे काम चुकीच्‍या पद्धतीने करण्‍यात आले आहे. यासंदर्भात आपण कायदेशीर कारवाई करणारच आहोत. पण, कृषी महोत्‍सवात बाधा आणणाऱ्यांची पर्वा आपण करीत नाही. आम्‍ही आचारसंहितेचे उल्‍लंघन केलेले नाही. हा कृषी महोत्‍सव याच ठिकाणी होणार, असा दावा रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.