अमरावती : दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे हे तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात, अशी खोचक टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सूर्जी येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

आमदार वानखडे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँगेसतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी, स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. वानखडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात ते उमेदवार राहू शकतात, हे लक्षात घेऊन रवी राणा यांनी आता त्यांना लक्ष्य केले आहे.

Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…
genelia and riteish deshmukh invited suraj chavan to their home
रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

हेही वाचा – पायाभूत सुविधा निर्माण कार्याचा रेल्वे गाड्यांना फटका; ‘या’ रेल्वे गाड्या रद्द व ‘यांच्या’ मार्गात बदल

रवी राणा म्हणाले, वानखडे यांना दर्यापूर मतदारसंघातील लोकांनी आमदार बनवले, पण ते तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलत आहेत. नेत्याच्या खुर्चीला लाथ मारण्याची ताकद असली पाहिजे, त्याला आमदार म्हणतात. त्याच्यात दुसऱ्यांना झुकवण्याची ताकद असली पाहिजे. आता अशी परिस्थिती आहे, की दर्यापूरचे आमदार दुसऱ्या नेत्यांच्या आश्रयाखाली आहेत. ते केवळ चपला उचलण्यात धन्यता मानतात, ते मतदारसंघाचा काय विकास करू शकतील.

हेही वाचा – राज्यात गेल्या नऊ महिन्यात वाघाचे आठ बछडे मृत्युमुखी; वाघांची संख्या वाढली, पण मृत्युचे प्रमाणही वाढले

आमदार रवी राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात त्यांनी पाच ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामधून त्यांनी विरोधकांवर शरसंधान केले आहे.