लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : महाराष्ट्रातील राजकारणांत सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. बडनेराचे आमदार रवी राणा व बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात आता जुंपली आहे. रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याला आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. आमदार रवी राणांना निवडणुकीपूर्वी त्यांची बायको सोडून जाणार, अशातला हा प्रकार आहे, असे अजब विधान आमदार नितीन देशमुख यांनी केले.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. नेत्यांकडून एकमेकांवर शरसंधान साधले जात आहेत. काही जण तर्कवितर्क देखील व्यक्त करीत आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी, ‘आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, ते सध्या अस्वस्थ असून नरेंद्र मोदींना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वदेखील स्वीकारतील,’ असा अंदाज व्यक्त केला होता.

आणखी वाचा-शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर… उपचाराला जायचे असल्यास…

आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्याचा आमदार नितीन देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला. अकोल्यात बोलताना त्यांनी रवी राणांवर निशाणा साधला. रवी राणांची बायको त्यांना निवडणुकीपूर्वी सोडून जाणार, अशातला हा प्रकार आहे, अशा शब्दात त्यांनी रवी राणांना प्रत्युत्तर दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi ranas wife will leave him before the election says thackeray group mla nitin deshmukh ppd 88 mrj