बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबरपासून निघणारी एल्गार रथयात्रा, मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाल्याने स्थगित करण्यात आली होती. ही यात्रा आता ५ नोव्हेंबरपासून शेगाव येथून काढण्यात येणार आहे.
रविकांत तुपकर यांनी यापूर्वी राज्यव्यापी दौरा, रथयात्रा आणि २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार महामोर्चाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचा दौराही पूर्ण केला. मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रथयात्रा स्थगित केली होती. आता मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण व मराठा आरक्षण आंदोलन स्थगित झाल्याने तुपकरांनी नियोजित रथयात्रेसह आंदोलनाचे नव्याने रणशिंग फुंकले आहे.
हेही वाचा – नक्षलवाद्यांकडून माजी सरपंचाची हत्या, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून कृत्य
हेही वाचा – यवतमाळ : बाभूळगावात कुख्यात गुन्हेगार, वाळू चोर देशी कट्ट्यासह ताब्यात
गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन निघणारी यात्रा पहिल्या दिवशी खामगाव तालुक्यात असणार आहे. त्यानंतर मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा, मोताळा मार्गे पुन्हा बुलढाणा येथे पोहचणार आहे. २० नोव्हेंबर रोजी यात्रेचा समारोप बुलढाण्यात भव्य एल्गार महामोर्चाने होणार आहे.