राज्याच्या राजकीय वर्तुळात बंडाचे वादळी वारे वाहत असतानाच या बंडाचे लोण सध्या एकाकी पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पोहोचण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे. बुलढाण्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकऱ्यांचा साक्षीने पार पडलेल्या वादळी बैठकीत याचे स्पष्ट संकेत मिळाले. 

संघटनेच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तुपकर व नेते राजू शेट्टी यांच्यातील वाढत्या अंतर वा दुराव्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले. तसेच अनेक महिन्यापासून साचलेली त्यांच्या मनातील खदखद बाहेर आली. यावेळी तुपाकरांनी नामोल्लेख न करता शेट्टीवर निशाणा साधला. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही. माझ्या सहकऱ्यांना व आम्हाला संपविण्याचा जो कुणी प्रयत्न करेल त्याला ‘ईट का जबाब पत्थर से देंगे.’ आता राज्यभर मोठी आणि नव्या दमाची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटने दुर्दैवी आहे. सोबतच्या माणसाने केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मात्र, मी आत्महत्या करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Criticism between the ruling party and the opposition vidhan sabha election 2024
‘दशकभराच्या पीछेहाटी’वरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
What Supriya Sule Said?
Supriya Sule : “मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाला सॉरी म्हटलं…”, अजित पवारांवर टीका करत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
pune assembly election 2024
पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

हेही वाचा >>> प्रेरणादायी! महिला मंडळाच्या श्रमदानातून उभारला जात आहे तुकाराम धाम; ओसाड जमिनीवर लोकसहभागातून सुंदर गार्डन

शेतकरी संघटना सोडल्यानंतर सदाभाऊ खोत आणि मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविली. शेकडो गुन्हे अंगावर घेतले, तुरुंगात गेलो परंतु संघटना आणि चळवळ जिवंत ठेवली. मात्र, दरम्यानच्या काळात पक्षातील काही नेत्यांकडून पंख छाटण्याचे काम होत आहे. आपला कार्यकर्ता मोठा होत असेल, त्याचे नेतृत्व फुलत असेल तर नेत्याच्या पोटात दुखायला नको, अशी व्यथा तुपकरांनी मांडली. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे, असे तुपकरांनी सांगितले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात नेत्यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत तुपकर हेच आपले नेते आणि तेच संघटना असल्याचे सांगत तुम्ही घ्याल ती भूमिका मान्य असल्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, तुपकरांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात बंडाचे निशान तर फडकविले नाही, अशी चर्चा बैठकीनंतर सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> बुकी जैनच्या लॉकरमध्ये आढळले घबाड; ४ कोटींचे सोने आणि अडीच कोंटींची रोख

संघटना खासगी मालमत्ता नाही

रविकांत तुपकर हेच लोकसभेचे उमेदवार असे राजू शेट्टी सांगतात. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात येतात आणि आम्हाला सांगत नाही, हा काय प्रकार आहे? असा प्रश्न तुपकरांनी उपस्थित केला. आम्ही बुलढाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, सरकार बरोबर आम्ही स्वतंत्र चर्चा केली, ही आमची चूक आहे का? नेतृत्वाला याचा आनंद व्हायला पाहिजे होता. आम्ही कार्यकर्त्यांनी संघटना घडविली, वाढविली आणि आता आम्हाला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र संघटना कुणाची खासगी मालमत्ता नसून सर्व कार्यकर्त्यांचीच आहे, असे तुपकरांनी ठणकावून सांगितले.