‘स्वाभिमानी’ चे नेते रविकांत तुपकर यांच्यासह २५ कार्यकर्त्यांविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी काल शनिवारी ( दि ११) मध्यरात्री गुन्हे दाखल केले असून तुपकरांना आज अटक करण्यात आली आहे. आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास तुपकरांसह आंदोलकांना चिखली पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- राज्यपालांच्या राजीनाम्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “विरोधकांनी स्वतःची पाठ…”

सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या विविध मागण्याकडे केंद्र व राज्य शासन करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तुपकर यांनी काल, शनिवारी दुपारी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर तीन तास जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत व लाठीमार करीत आंदोलन उधळून लावले. तुपकरांसह प्रमुख पदाधिकारी व शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा- सुनील गावसकर म्हणाले, “ती मला दिल्लीत भेटली, आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहायचो!”, व्हॅलेंटाईन विकमध्ये सांगितली ‘मन की बात’

मध्यरात्री तुपकर यांच्यासह २५ जणांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना अटक करून आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांना चिखली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा- शालेय विद्यार्थ्यांनंतर आता नागपूर मेट्रोची पदवीधर, पदविकाधारकांसाठी सवलत

त्याअगोदर काल रात्री उशिरापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ तुपकरांनी पोलीस ठाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर कडक बंदोबस्त लावण्यात आला. नेतेच काय पत्रकारांनाही वार्तांकन करण्यासाठी ठाण्यात जाऊ देण्यात आले नाही. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांना ठाण्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे बोन्द्रे यांनी काही काळ ठाण्यासमोर ठिय्या धरला. नंतर त्यांनी तुपकरांची भेट घेतली. यापाठोपाठ पत्रकारांनीही ठिय्या धरला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravikant tupkar gets arrested by the police during protest in buldhana scm 61 dpj