बुलढाणा : Ravikant Tupkar protest for farmers शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुणे येथे २४ जुलैला महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली होती. या आघाडीच्या स्थापनेनंतर आज रविकांत तुपकर यांनी  शिंदे गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मेहकर नगरीत शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात आक्रोश मोर्चा काढला. आज सोमवारी, २९ जुलै रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात पदाधिकरी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले.     

पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  नेतृत्वाखाली  घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास राज्य सरकारला हादररुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करतांना दिला.  या आंदोलनाची सुरुवात मेहकरातूनच करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
alibag Adv Aswad Patil resigned from post of district secretary of Shekap
अॅड. आस्‍वाद पाटील यांचा अखेर राजीनामा
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
Farmers at their protest site at Shambhu border, in Patiala district, Punjab, Saturday,
Farmer Protest : पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

हेही वाचा >>> यवतमाळात पाऊस थांबायचे नाव घेईना, जनजीवन विस्कळीत; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १०० टक्के पीकविमा मिळावा, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई  देण्यात यावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे,  शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या वतीने मेहकर तहसील वर हा मोर्चा काढण्यात आला.

मेहकर येथील शासकीय विश्राम गृह येथून निघालेला हा मोर्चा प्रमुख मार्गाने जात मेहकर तहसीलवर धडकला. प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी आम्ही आजवर विविध आंदोलने केली आहेत परंतू सरकार निगरगटपणे वागत आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देत आहेत. सरकार जर शेतकऱ्यांचा विचारच करणार नसेल तर सरकारला जागे करण्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे, सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही व आठ दिवसांचा आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा करावा, अन्यथा राज्य सरकारला हादरुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. या आंदोलनाची सुरुवात मेहकरातूनच करु, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ना कोणते ॲप उघडले, ना लिंकवर क्लिक केले, तरीही शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे लंपास…तुम्हीही ही चूक….

मोर्चाला गजानन अमदाबादकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, डॉ. ऋतुजा चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव  लाड यांनी संबोधित केले. मोर्चा मध्ये नामदेव पंतगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे, कल्पना टाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले.

भरपावसात सभा

आक्रोश मोर्चात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान पावसाने हजेरी लावली तरी शेतकऱ्यांनी मैदान  सोडले नाही. भरपावसात तुपकरांच्या भाषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामुळे हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

Story img Loader