आत्मदहन आंदोलनानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज रविवारी (१२) त्यांना बुलढाणा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्यांची न्यायालयीन कोठडीस रवानगी करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “आता पैसे देणाऱ्यांचे सरकार आले आहे”, देवेंद्र फडणवीसांचा आघाडीला टोला; म्हणाले, “फुटकी कवडी न देणाऱ्यांना..”

आत्मदहन आंदोलनानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांना ताब्यात घेतले होते. नंतर रात्री एक वाजताच्या सुमारास त्यांच्यासह २१ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये कलम ३५३, १४७, १४८, १४९, १०९ , ३३६, ३०९ या अजामीनपात्र कलमांचा समावेश आहे. उत्तररात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांना चिखली पोलीस ठाण्यात हलविले होते. आज त्यांना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.