बुलढाणा: समृद्धी महामार्गावर झालेल्या सर्वच अपघात व मृत्यूंसाठी सरकार जबाबदार आहे. या मृत्यूप्रकरणी राज्य शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. या मार्गावर परिपूर्ण सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी शासनाला आणखी किती बळी हवे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. येथे प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना तुपकर यांनी ही मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चंद्रपूर : दीक्षाभूमीवर अवतरली निळाई, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याला सुरुवात

हेही वाचा – ‘एफबी फ्रेंड’कडे विवाहित महिला गेली नांदायला अन…

तुपकर म्हणाले की, समृद्धी मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण सुविधा नव्हत्या. याउप्परही केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी घाई गडबडीत समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. आजवर शेकडोंच्या संख्येत बळी गेले, जायबंदी झालेत. १५ ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, १ जुलैला बुलढाण्यात २५ जणांचे बळी गेले, या महामार्गावर सुरक्षेच्या उपायोजना करणे गरजेचे आहे. रोम जळत असताना राजा जसा फिडल वाजवत बसला होता त्याच धर्तीवर समृद्धी महामार्गावर लोकांचे जीव जात आहे आणि राज्यकर्ते निष्क्रियपणे फक्त बघत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravikant tupkar statement in buldhana on samruddhi highway accident scm 61 ssb
Show comments