लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: यंदा तलाठी भरतीसाठी दहा लाखांवर अर्ज आले आहेत. राज्याच्या तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर येत आहेत. २०१९ला झालेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यामुळे आता होणाऱ्या तलाठी भरतीमध्ये घोटाळे रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहे. आपण जर तलाठी भरतीसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी नक्कीच वाचा.

sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Special campaign for caste certificate verification.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…

यावेळी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची सोय राहणारच आहे. मात्र, उमेदवारांची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. काही उमेदवार आधुनिक यंत्रांचा वापर करून गैरप्रकार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता उमेदवारांची परीक्षा केंद्राच्या बाहेर आणि नंतर केंद्रामध्ये प्रवेश झाल्यावरही तपासणी होणार आहे. उमेदवार आपल्या जागेवर बसला की त्याची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे.

हेही वाचा… नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

तसेच कुठल्याही उमेदवारावर जर संशय असेल त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आणि त्याचा संपूर्ण चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये जाणाऱ्या उमेदवारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर जाताना कुठलेही तांत्रिक उपकरण सोबत ठेऊ नका, हाताला घड्याळ बांधू नका याशिवाय अनेक नियम पाळावे लागणार आहेत.

Story img Loader