नागपूर : २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवासी संख्या २.२८ लाखांनी वाढली आहे. नागपूरसाठी ही प्रवासी संख्या आजवरची सर्वाधिक आहे. याशिवाय उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे बघून स्टार एअर या हवाई वाहतूक कंपनीने नागपूरहून पुणे आणि बंगळुरूकरिता अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडे नागपूर शहरात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. नागपूर आणि विदर्भात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी देखील बाहेरून नागपुरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मध्यमवर्गीय लोकांचा कलही विमान प्रवासाकडे वाढू लागला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२३-२४ या आर्थिक वर्षांत २७.९४ लाख लोकांनी विमान प्रवास केला. वर्षभरात २२ हजार विमानांनी उड्डाण घेतले. यामध्ये नागपुरातून परदेशात गेलेल्यांची संख्या १.११ लाख तर घरगुती प्रवाशांची संख्या २६.८३ लाख आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
FIIs invest Rs 85000 cr in equity market
परकीय विक्रेत्यांपेक्षा देशांतर्गत खरेदीदारांचा बाजारात जोर; ‘एफआयआय’ची ८५,००० कोटींच्या समभाग विक्री, तर ‘डीआयआय’कडून १ लाख कोटींची खरेदी
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
BRICS summit
‘ब्रिक्स’ची २०२६ पर्यंत जागतिक व्यापारात जी७ देशांना मात
tejas mk1a
विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?

हेही वाचा…लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात अद्भूत ‘किरणोत्सव’! स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अनोखा मिलाफ

२०२२-२४ या आर्थिक वर्षांत नागपुरातून २५.६६ लाख प्रवाशांचे आवागमन झाले होते. नागपुरातून दररोज सरासरी सात ते आठ हजार लोक विमान प्रवास करतात. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, इंदूर, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, लखनौ, नाशिक, बेळगाव, अजमेरसाठी विमाने आहेत. याशिवाय शारजहा आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय विमानसेवाही आहे.

हेही वाचा…काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! ‘चारधाम’साठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

पुणे, बंगळुरूकरिता विमानांच्या संख्येत वाढ

स्टार एअर एअरलाईन्स नागपूरहून पुणे आणि बंगळुरूकरिता नवीन विमाने सुरू करीत आहे. ही सेवा २८ मे ते ११ जूनपर्यंत राहणार आहे. आठवड्यातून दोन दिवस (मंगळवार आणि रविवारी) ही सेवा सुरू असेल. यापूर्वी स्टार एअरने नागपूरहून बेळगाव आणि किशनगड साठी उड्डाणे सुरू केली आहेत. आता नागपूर ते पुणे आणि बंगळुरू मार्गावर नवीन उड्डाणे सुरू करत आहे. त्यामुळे, प्रवाशांना उन्हाळ्यात दोन अतिरिक्त उड्डाणाची भेट मिळत आहे. फ्लाइट क्रमांक एस ५-२४५ बेंगळुरूहून २८ मे रोजी सकाळी ७.४५ वाजता निघेल आणि नागपूरला सकाळी ९. ३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे फ्लाइट क्रमांक एस ५-२४६ नागपूरहून दुपारी २.५५ वाजता उड्डाण करेल आणि ४.४० वाजता बेंगळुरूला पोहोचेल. फ्लाइट क्रमांक एस ५-२५३ नागपूरहून सकाळी १० वाजता उड्डाण करेल आणि ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. तर फ्लाइट क्रमांक एस ५-२५४ पुण्याहून दुपारी १२ वाजता निघेल आणि नागपूरला दुपारी १.२० वाजता पोहोचेल.