लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पोटाला चिमटा काढून मुलाबाळांच्या भविष्यासाठी जमा केलेला सर्वसामान्य जनतेचा पैसा एका भामट्याने पळवला. हिंगणा तालुक्यातील ही घटना आहे. प्रदीप खंगार असे बेपत्ता झालेल्या तथाकथित टपाल एजंटचे नाव आहे. तो २७ जूनपासून फरार आहे. त्याने शेकडो ठेवीदारांकडून आरडी आणि एफडीएच्या नावे खातेदारांकडून घेतले पण, टपाल खात्यात जमा केले नाही. प्रदीप खंगार हा व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. इकडे त्याच्याकडे पैसे जमा करणारे ग्राहकानी १ जुलै ला तक्रार दिली. मात्र अजूनही त्याचा पत्ता लागला नसल्याने शेकडो महिला व पुरुष ग्राहक अजूनही पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत

तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत येथील रहिवासी प्रदीप खंगार वय ६१ वर्षे या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर टपाल खात्याची एजन्सी घेतली. लोकांच्या घरी जाऊन तो बचत योजनांसाठी पैसे गोळा करीत होता. पंचवीस ते तीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याने खातेदारांचा विश्वास संपादन केला होता. दैनंदिन पैसे वसुलीसाठी तो फिरायचा. अचानक २७ जून २०२४ पासून तो बेपत्ता आहे. त्यामुळे ग्राहकांनी टपाल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता , सदर व्यक्तीने २०२२-२३ पासून टपाल कार्यालयात खातेदारांची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार केली. पण अद्याप तो काही सापडला नाही.

आणखी वाचा-नागपूर : दीक्षाभूमीवरील वाहनतळासाठीचे खड्डे बुजवणार, नासुप्रच्या बैठकीत निर्णय

खातेदारांनी सातशेच्यावर आरडी खात्याचे पासबुक आणि व्यवहाराच्या डायऱ्या पोलिसांकडे जमा केल्या होते. पोलिसांनी तक्रार लिहून आज त्या ग्राहकांना पासबुक परत नेण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे आजही शेकडो महिला व पुरुष पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र अजूनही पोलिसांना प्रदीप बाबत काहीच माहिती मिळाली नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.लवकरात लवकर पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोज पोलीस ठाण्यात जातात, चौकशी करतात आणि परत घरी जातात. शेकडो खातेदार एफडी व आरडी चे ग्राहक आहेत. खातेदारांची फार मोठया प्रमाणावर फसवणूक झाली आहे. मुळात पत्नीच्या नावावर पोस्ट एजन्सी असली तरी कारभार मात्र प्रदीप खंगार हेच करायचे. हिंगणा , रायपूर व वानाडोंगरी येथील शेकडो खातेदार त्यांच्यावर विश्वास ठेवूनी त्यांना ठरलेली रक्कम रोजच भरणा करण्यासाठी द्यायचे. मात्र सातशे ग्राहकांचे सुमारे २० कोटी रुपयांचा हा अपहार करून प्रदीप झाला.

आणखी वाचा-रणथंबोरच्या “रिद्धी” वाघीण आणि बछड्यांची कमाल पहिलीत का !

तक्रारी प्राप्त, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही…

या प्रकरणात आलेल्या तक्रारी पोलिसांनी घेतल्या आहेत. मात्र प्रदीप चा शोध सुरू करण्यात आला असून तो पोलिसांना मिळाला नाही. तसेच अद्याप त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.असे ठाणेदार विनोद गोडबोले यांनी सांगितले. तर हिंगणा पोस्ट ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रदीप हा अधिकृत एजंट नव्हता. तसेच त्याच्या एजंट पत्नीच्या नावाने काही ग्राहकांचे खाते असल्याचे सांगितले मात्र त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या ग्राहकांच्या ठेवीशी पोस्ट खात्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recovery of postal schemes in the name of wife fraud with account holders cwb 76 mrj
Show comments