वाशिम : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध १८ प्रकारांतील २४२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशी २४२ पदे भरावयाची आहेत. ही पदे भरण्याबाबत शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतनश्रेणी, परिक्षेचे स्वरुप, वयोमर्यादा, सामाजिक, समांतर व सर्व प्रकारचे आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, अनाथ, दिव्यांग, फॉर्म भरण्याची पद्धत व मुदत तसेच आवश्यक कागदपत्रे, फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी व पद्धती ईत्यादी सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा – रेल्वेप्रवाशांसाठी आनंदवार्ता! नागपूर-उमरेड नवीन मार्गावर धावणार रेल्वेगाडी
हेही वाचा – अकोला: अद्ययावत माहिती न ठेवणे भोवले; नऊ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
केवळ ऑनलाईन अर्ज ग्राह्य
जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या १८ पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे अर्ज केल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे केवळ ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले आहे.