नागपूर : केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या, भरपूर पगार व प्रतिष्ठा असणाऱ्या नोकऱ्या आहेत. त्यासाठी जर प्रयत्न केले तर सुशिक्षित पदवीधरांना नव्या वाटा, नवीन संधीतून आयुष्याचे सोने करता येणे शक्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कडून नुकतीच सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या (ग्रेड अ) भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल १५० जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १५० रुपये असून इतरांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आहे. पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे तर कमाल वय ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसची घराणेशाही अन् राष्ट्रवादी काँग्रेस सरदारांची फौज, बावनकुळे यांची टीका

हेही वाचा – आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

सहाय्यक पदासाठी पूर्वपरीक्षा व नंतर यात उत्तीर्ण झालेल्यांची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात नियोजित आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२३ आहे. अर्ज करण्यापूर्वी, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ nabard.org ला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for as many as 150 government posts golden opportunity for educated unemployed pbr 75 ssb