वर्धा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खुशखबर आहे. या कंपनीत १ हजार ८२० शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. १६ डिसेंबरपासून नोंदणी सुरू होणार. अंतिम तारीख ५ जानेवारी २०२४ ही आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकच अधिक बेशिस्त! उपसभापतींची शिक्षक आमदारांना समज

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसींच्या १० पैकी ८ मागण्या मान्य, चिमूर येथे सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण मागे

कंपनीच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. ऑनलाईन चाचणीद्वारे निवड केल्या जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची राहणार. उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमध्ये आयआयटी डिप्लोमा अपेक्षित आहे. या जागा टेक्निकल अप्रेंटीस पदासाठी आहेत. वय १८ ते २४ दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गास नियमानुसार वयात सवलत मिळणार. शिवाय ज्या उमेदवारांनी अन्य कोणत्याही उद्योगात शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे ते या पदासाठी अर्ज करू शकणार नाही.

Story img Loader