अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत आहे. एकूण १६६ जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अमरावतीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली असून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही जाहिरात उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रुग्णालय प्रशिक्षण केंद्रावर अर्ज सादर करता येऊ शकतील.

एकूण १६६ पदांपैकी स्टाफ नर्स १२४ पदे, मेडिकल ऑफिसर (पुरूष) ७ पदे, मेडिकल ऑफिसर (महिला) ५ पदे, लॅब टेक्निशियन १० पदे, फार्मासिस्ट ०७ पदे, प्रोग्राम असिस्टंट (स्टॅटिस्टिक्स) १ पद, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर १ पद, फिजिओथेरेपिस्ट १ पद, न्यूट्रिनिस्ट १ पद, कौन्सलर ८ पदे आहेत.

निव्वळ कंत्राटी पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह मंजूर पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत  १९/०३/२०२५ पासून ते ०३/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारण्यात येतील, तसेच दि.०३/०४/२०२५ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा व ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.

जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमितची पदे नसुन सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचे हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण हिंवा त्यासबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.

जाहिरातीत नमुद वय अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव व नोंदणी प्रमाणपत्र जाहीरातीच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राहय धरले जाईल. सदर पदाकरीता प्रतिक्षा यादी ही पुढील १२ महिन्याकरीता मंजूर राहील. तसेच भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखादया ठिकाणी कर्मचारी मानी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास नविन भरती प्रकिया न करता प्रतिक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती आदेश दिले जातील, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

Story img Loader