नागपूर : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ६०२ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.
पदनाम/पदांची संख्या : यांमध्ये उच्चश्रेणी लघुलेखक पदांच्या ३ जागा, निन्मश्रेणी लघुलेखक पदांच्या १३ जागा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांच्या १४ जागा, संशोधन सहाय्यक पदांच्या १७ जागा, उपलेखापाल / मुख्यलिपिक पदांच्या ४१ जागा , वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक पदांच्या १८७ जागा, लघुटंकलेखक पदांच्या ५ जागा, गृहपाल ( पुरुष ) पदांच्या ४३ जागा, गृहपाल ( स्त्री ) पदांच्या २५ जागा. तर अधिक्षक ( पुरुष ) पदांच्या २६ जागा, अधिक्षक ( स्त्री ) पदांच्या ४८ जागा, ग्रंथपाल पदांच्या ३८ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या २९ जागा, आदिवासी विकास निरीक्षक पदांच्या ८ जागा, सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या ०१ जागा, प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) पदांच्या २७ जागा, तर माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) पदांच्या १५ जागा, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदांच्या १४ जागा, तर प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) पदांच्या ४८ जागा अशा एकूण ६०२ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
हेही वाचा – आदिवासी विभागात महाभरती; दहावी, बारावी, डीएड-बीएड धारकांनाही सुवर्णसंधी
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी / १२ वी / १० वी / एमएसडब्लू / बीएसडब्लू / डी एड / बीएड/बी.लीफ /एम लीफ / वाणिज्य पदवी टायपिंग प्रमाणपत्र, तसेच पदांनुसार इतर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने २३ नोव्हेंबर २०२३ दुपारी १५.०० पासून ते १३.१२.२०२३ रात्री २३.५५ पर्यंत सादर करू शकता.