नागपूर: राज्याच्या जलसंपदा विभागामध्ये सध्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ श्रेणींमध्ये मोठ्या प्रमाणात पदे आहेत. या विभागात अनेक वर्षांपासून अनेक पदे आहेत. २०१३ पासून गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी भरती झालेली नाही. कोकण विभाग कृषी पदवीधर संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या पदांसाठी कृषी पदवी किंवा प्रमाणपत्र ही एकमेव शैक्षणिक अट करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता! शिवसेनेची थेट पोलिसात तक्रार; शोधणाऱ्यास अकराशे रुपयांचे बक्षीस
शिवाय, राज्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि सिंचन क्षमता वाढविण्याबाबत शक्य तितक्या लवकर भरण्यात यावीत असे म्हटले आहे. यावर सरकार सकारात्मक असून लवकरच ११,००० पदांची भरती होणार आहे. विद्यार्थी अनेक वर्षांपासून या पदभरतीची वाट बघत होते. या भरतीमध्ये गट ‘क’साठी नाईक- २४५, शिपाई थेट- २३५७, चौकीदार- १०५७, कालवा चौकीदार- ७८४, कालवा टपाली- ३३० अशा विविध पदांची समावेश राहणार आहे.