नागपूर: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आता ५ जानेवारीला होणारी गट-ब तर २ फेब्रुवारीला होणारी गट-क परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. मात्र याशिवाय अन्य परीक्षांचा यात समावेश करण्यात आला आहे. या कुठल्या परीक्षा आहेत ते पाहूया. या विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. १ जानेवारी ते १० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
एमपीएससी’कडून दरवर्षी सर्वाधिक पदे ही गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. यामुळे विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत असतात. यावर्षी संयुक्त परीक्षेची जाहिरात येण्यास जवळपास सहा महिन्यांचा विलंब झाला. त्यामुळे अनेक उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना फटका बसला. अशा उमेदवारांना किमान दोन परीक्षेसाठी वयोमर्यादेमध्ये शिथीलता द्यावी अशी मागणी केली जात होती.
हेही वाचा >>>नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
अखेर राज्य शासनाने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ देण्याची मागणी मान्य केली. तसेच ‘एमपीएससी’च्या १ जानेवारी ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यामुळे तब्बल १८१३ जागांसाठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेसाठी अर्जाची संधी उमेदवारांना मिळणार आहे. यासंदर्भात लवकरच एमपीएससीकडून परिपत्रक येण्याची शक्यता आहे. वयोमर्यादेमध्ये शिथीलता देण्यात आल्याने आता ५ जानेवारीला होणारी गट-ब तर २ फेब्रुवारीला होणारी गट-क परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. एमपीएससीच्या संकेतस्थळावर कुठल्या परीक्षा समोर ढकलण्यात आला त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. यात जवळपास तेवीस परीक्षांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.- महेश घरबुडे अध्यक्ष ,स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.
या परीक्षांचा समावेश
*उच्च व तंत्रशिक्षण विभाग- सहायक ग्रंथालय संचालक/जिल्हा ग्रंथालय अधिकारी, गट-ब.
*पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग- उप संचालक, महाराष्ट्र भूजल सेवा, गट-अ
*वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग- विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक,
*महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
*गृह विभाग- विधि सल्लागार, गट-अ
*सार्वजनिक आरोग्य विभाग – सहायक संचालक-आरोग्य सेवा (वाहतूक), गट-अ