नागपूर : नोकर भरतीचा फोडलेला पेपर आम्ही जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या खात्याचे, महाराष्ट्राचे “ऊर्जा मंत्री” खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आम्ही पुराव्यानीशी सिद्ध केलंय की पेपर फुटला आहे, आता घोटाळेबाजांवर आपण काय कार्यवाही करता ते आम्हाला बघायचेच आहे. विधिमंडळात आपण खोटे बोलला होतात आता हे मान्य करा. उपमुख्यमंत्री साहेब आणि झेपत नसेल तर राजीनामा द्या. तुम्हाला पेपर नीट घेता येत नाहीत मग महाराष्ट्र कसा सांभाळता, असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धा परीक्षा समितीने फुटलेला पेपर काल एक्स वर जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलिस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जा चे खाते आहे तर आता महाजनकोचा पेपर फुटला असा आरोप समितीने केला आहे. आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा आणि लवकरात लवकर पेपरफुटी वर कायदा निर्माण करा. फडणवीस साहेब राजीनामा द्या अशी मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment paper leaked devendra fadnavis resign competitive examination coordinating committee dag 87 ysh