नागपूर : राज्यात प्रत्येक वर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळतात. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढते. यंदा १ जानेवारी ते ३० जुलैदरम्यान सर्वात कमी म्हणजे केवळ १ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात २०१९ मध्ये डेंग्यूचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या २०२० मध्ये ३ हजार ३५६ रुग्ण होती. त्यापैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये राज्यात १२ हजार ७२१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु यंदा १ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान १ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली, तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती मिळाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in