ऑर्किड्स… निसर्गाला पडलेले मनोहारी स्वप्न ! २८००० पेक्षा जास्त विभिन्न प्रजाती ! बर्फाळ प्रदेशापासून ते तुफान पावसाच्या घनदाट अरण्यापासून ते अगदी वाळवंटात सुद्धा ऑर्कीड्स प्रजाती आढळून येतात. भारतात तब्बल १२५६ प्रजातींचे ऑर्कीड्स आढळून येतात, ज्यापैकी जवळपास ३८८ प्रजाती या प्रदेशनिष्ठ असून फक्त भारतातच आढळतात.

ज्याप्रमाणे एखाद्या अधिवासात वाघ असणे हे त्या परिसंस्थेच्या आरोग्याचे सूचक असते, तसेच ऑर्कीड्सचे असणे हे त्या त्या पारिस्थितीकीमध्ये समृद्धता आणि एकंदरीत तिथल्या निसर्गाचे आरोग्य सुदृढ असल्याचे दर्शक आहे. सध्या आंबाघाट परिसरातून पुढे जाणाऱ्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाचे काम जोर धरू लागले आहे. या रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे कोल्हापूर-आंबाघाट परिसरातील रस्त्याच्या दोन्हीं बाजूने असणाऱ्या मोठ-मोठ्या व शेकडो वर्षांपासून दिमाखात उभ्या असणाऱ्या बहुमोल व दुर्मिळ प्रजातीच्या वृक्ष संपदेवर सपासप घाव घातले जात आहेत. या निसर्गसंपदेचे संवर्धन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नेचर काँझर्वेशन सोसायटी प्रयत्न करत आहे. त्यांच्यासोबत ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन व वनविभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गात रंगाची उधळण करणाऱ्या आणि निसर्गाचे सौंदर्य खुलविण्याऱ्या ऑर्किड वनस्पतींना वाचवण्याची आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची मोहीम आखलेली आहे.

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

या मोहिमेअंतर्गत मार्च महिन्यात पहिल्या पंधरवड्यात बांबवडे ते साखरपा परिसरातील रस्त्याकडेच्या तोडलेल्या व तोडल्या जाणाऱ्या झाडावरून तीन दुर्मिळ प्रजातीच्या ११५०पेक्षा जास्त ऑर्किड्स वनस्पतींना मोठ्या जिकिरीने काढून तीन टप्प्यात त्यांचे पुनःरोपण आंब्यामधील जंगलामध्ये करण्यात आले होते. चौथ्या टप्प्यात दोन एप्रिलला पाच प्रजातींच्या १८६० ऑर्किड्सचे पुनर्वसन करून मागील पुनर्वसित वनस्पतींना पाणी दिले गेले. यामध्ये सीतेची वेणी, द्रौपदी पुष्प, शरद आमरी, गुलाबी द्रौपदी पुष्प आणि वाघरी या पश्चिम घाटातील अती-दुर्मिळ आणि नष्टप्राय असलेल्या एकूण ३०१० ऑर्किड वनस्पतींचे पुनर्वसन केल्याची आत्तापर्यंतची देशातील ही सर्वात मोठी मोहीम असल्याचे दिसून येते आहे. पावसाळ्यात या वनस्पती स्थिर होईपर्यंत त्यांची निगा सुद्धा राखली जाणार आहे. या मोहिमेमध्ये निसर्गप्रेमी मित्र गृप, (पेठवडगाव) आणि आंबा गावचे ग्रामस्थ यांचे सहाय्य लाभले. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वबळावर सर्व नियोजन करून ही मोहीम फत्ते केली आहे.

ही आहे मोहीम फत्ते करणारी चमू !!

या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष तबरेज खान, माजी वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूरचे मानद वन्यजीवरक्षक स्वप्नील पवार, धनंजय जाधव, गुणकली भोसले, कृतार्थ मिरजकर, विवेक कुबेर, अमोल जाधव, अनिकेत ढाले, अभिजित लोखंडे, संतोष शिरगावकर, राहुल गायकवाड, सौरभ किनिंगे, विकास जाधव, कौसतुभ पोळ, प्रमोद जगताप, संतोष शिरगावकर व निसर्गप्रेमी मित्र गृप वडगावचे डॉ. अमोल पाटील, निलेश घरसे आणि इतर सदस्य, आंबा गावचे अजिंक्य बेर्डे, अमित गद्रे व ग्रामस्थ सहभागी होते.