जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख झाल्यानंतर तरुण-तरुणीचे साक्षगंध झाले. लग्नाची तारीख ठरल्यानंतर दोघांनीही सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. होणाऱ्या पत्नीचे काही महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण केल्यानंतर युवकाने लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सुशिल (३२, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा- नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा मोबाईल सापडले; टोळ्या अजून सक्रियच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय तरुणी संजना (काल्पनिक नाव) ही पदवीचे शिक्षण घेत असताना तिच्या कुटुंबियांनी जीवनसाथी शादी डॉट कॉमवर प्रोफाईल तयार केले होते. त्यामुळे काही उपवर तरुणांचे लग्नसंबंधाने फोन येत होते. दरम्यान सुशिल यानेही लग्नासाठी लग्नासाठी प्रोफाईल तयार केले होते. सुशिलला संजना फोटोवरून आवडली आणि त्याने लगेच तिला फोन केला. दोघेही फुटाळा तलावावर भेटले. लग्न करण्याचा निर्णय घेतला. साखरपुडा उरकला. त्यानंतर सुशिलने १ सप्टेबर २०२२ ला तिला घरी नेले. शारीरिक संबंधाची मागणी घातली. तिने नकार देताच त्याने बळजबरी संबंध प्रस्थापित केले. तो वारंवार तिला घरी नेऊन शारीरिक संबंध ठेवत होता. नकार दिल्यास लग्न मोडण्याची धमकी देत होता. त्यामुळे संजनासुद्धा बदनामीच्या भीतीने त्याच्यासोबत फिरायला जात होती. लग्नाची तारीख जवळ येताच त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे संजना नैराश्यात गेली. शेवटी तिने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन होणाऱ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.